आता या अभिनेत्रीला लागले निर्माती होण्याचे डोहाळे, तुम्हीच पाहा कोण आहे ही

By  
on  

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ सध्या ‘भारत’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सलमान कतरिना ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येत आहे. पण कतरिना आणखी एका माध्यमातून नशीब आजमावणार आहे. कतरिनाला आता निर्माती बनण्याची इच्छा आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी चर्चा करताना कतरिनाने ही इच्छा बोलून दाखवली आहे. यावेळी कतरिना म्हणते, ‘होय ! मी स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरु करणार आहे. यावर्षाखेरीस हा बेत तडीस नेण्याची माझी इच्छा आहे.’

https://www.instagram.com/p/BxrzsMxhsWD/?utm_source=ig_web_copy_link

जर कतरिनाने प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं तर तीही दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माच्या यादीत जाऊन बसेल. कतरिना पुढे म्हणते, ‘मला अशी आशा आहे की माझं नाव देखील निर्माती म्हणून प्रस्थापित व्हावं. बघु पुढे काय होतं ते’. आता कतरिना निर्माती म्हणून यशस्वी होते का ते लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share