By  
on  

आपल्या गरोदर गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालतर्फे आलिशान पार्टीचं आयोजन

अभिनेता अर्जुन रामपाल पत्नी मेहर जेसियापासून अनौपचारिकरित्या वेगळा झाला आहे. यानंतर तो नव्या नात्यात अडकला आहे. अर्जुन कपूर सध्या साऊथ आफ्रिकन गर्लफ्रेंड गैब्रएला डेमेट्रिअड्ससोबत आहे. त्याची ही गर्लफ्रेंड सध्या गरोदर असून तीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभासाठी अर्जुनने मुंबईत शानदार पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीला अर्जुनने त्याच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना आमंत्रित केले आहे.

अर्जुनने गैब्रएला गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली. अर्जुनने या नव्या नात्याची माहिती पूर्वपत्नी मेहर जेसिया आंणि माहिका व मायरा यांना सुद्धा दिली. अर्जुनचं आपल्या मुलींसोबत एक अनोख नातं आहे. अर्जुनच्या दोन मुलींनी या नव्या नात्याचा मोकळेपणाने स्वीकार केला. आणि त्या आपल्या वडलांच्या या नव्या आयुष्याविषयी आनंदात आहेत.

https://www.instagram.com/p/BwmuNENFDOz/

 

अर्जुनने १९९८ साली मेहर जेसियासोबत लग्न केलं. लग्नानंतर २० वर्षांनी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण अद्याप कळू शकलं नाही. अर्जुन गर्लफ्रेंड गैब्रएलासोबत लग्न कधी करणार, या चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगत आहेत. परंतु लग्नासंबंधी या दोघांकडून अजून कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive