By  
on  

तैमुरला ‘हा’ खाऊ खायला फिटनेस प्रेमी आई करीनाची आहे मनाई

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या फिटनेसबद्दल कितपत आग्रही आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण एक उत्तम आई असलेली करीना तैमुरच्या फिटनेसबाबतीत देखील आग्रही आहे. अलीकडेच नवाबसाहेब सैफ अली खान आणि त्यांची बेगम करीना कपूर यांनी तैमुरच्या फिटनेसबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या. डाएटिशन ऋजुता दिवेकरशी बोलताना करीना आणि सैफने हे रहस्य उघड केलं आहे.

करीनाने यावेळी स्पष्ट केलं की एक काळजीवाहू आई असल्याने ती तैमुरला आजिबात बाहेरचं अन्न खाऊ देत नाही. विशेषत: बर्थ डे पार्टीमधील खाऊ ती तैमुरला अजिबात खाऊ देत नाही. करीना याविषयी सांगते, ‘तो अनेक बर्थ डे पार्टीला जातो. पण त्याला तेथील पदार्थ खाऊ न देण्यावर माझा भर असतो. हे थोडंफार चुकिचं असेलही’. यावर सैफ मध्येच म्हणतो, ‘तो चिप्स खातो’. तैमुरचं डाएट कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलं असता करीना म्हणते, खिचडी, डोसा, इडली आणि घरी शिजवलेलं मुख्यत्वे तैमुरच्या डाएटमध्ये असते. याशिवाय उपलब्ध फळं आणि भाज्याही त्याच्या डाएटमध्ये आहे. अनेकदा तो भाज्या खायला नकार देतो. पण यातील पोषक घटक मिळावेत म्हणून त्याला खाऊ घालण्याचा माझा आग्रह असतो.’

Recommended

PeepingMoon Exclusive