By  
on  

सलमानला साकारायचा आहे ‘या’ इतिहासकालीन योद्ध्याचा बायोपिक

बॉलिवूडचा दबंग खान ‘भारत’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना आणि दिशा पाटनीदेखील आहेत. या प्रमोशन दरम्यान सलमानने एक इच्छा व्यक्त केली आहे. सलमानला या प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करायचं आहे. सलमानला साकारायची असलेली व्यक्तिरेखा कोणत्याही प्रसिद्ध राजकारणी किंवा कलाकाराची नाही. सलमानला अत्यंत कुप्रसिद्ध ऐतिहासिक अशी व्यक्तिरेखा साकारायची आहे.

सलमानला कुप्रसिद्ध मंगोल शासक चंगेझ खान याची व्यक्तिरेखा साकारायची आहे. एका मुलाखतीमध्ये सलमानला कोणत्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असं विचारलं असता त्याने हे उत्तर दिलं. सलमान म्हणतो,’ मला पडद्यावर कुणाचा जीवनपट साकारायची संधी मिळाली तर मी मंगोल शासक चंगेझ खान साकारेन.’ आता सलमानची ही इच्छा कोणती दिग्दर्शक-निर्माता जोडी पुर्ण करतात ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive