अजय देवगणचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन

By  
on  

अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची खबर चर्चेत होती. परंतु आज सकाळी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.

वीरू देवगण हे बॉलीवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक होते. त्यांनी ऐंशीहून अधिक सिनेमांमध्ये अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले होते. १९९९ साली आलेल्या 'हिंदुस्तान कि कसम' हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात अजय देवगणची प्रमुख भूमिका होती.

वीरू देवगण हे २०१६ साली एका पुरस्कार सोहळ्यात आपल्या सुनेसोबत अर्थात अभिनेत्री काजोल सोबत दिसले होते.

Recommended

Loading...
Share