By  
on  

इरफान पुन्हा एकदा लंडनवारीवर, यावेळी मात्र वेगळंच आहे कारण

अभिनेता इरफान खान  न्यूरोऐंडोक्राइन ट्यूमरवर उपचार घेऊन काही दिवसांपुर्वीच लंडनहून आला होता. पण इरफानला पुन्हा एकदा लंडनवारी करावी लागणार आहे. पण त्याच्या यावेळच्या लंडनवारीचं कारण मात्र वेगळं आहे. यावेळी इरफान ‘अंगेजी मिडियम’च्या शुटिंगनिमित्त लंडनला चालला आहे. इरफान यावेळी महिनाभर लंडनला राहणार आहे.

होमी अदजानिया निर्मित या सिनेमात करीना कपूर आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय राधिका मदानही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. राधिका टीमला लंडन इथे जूनमध्ये जॉईन करेल. तर करीना या टीमला जुनच्या मध्यावर जॉईन करेल. करीना या सिनेमात पोलिस अधिका-याच्या व्यक्तिरेखेत दिसेल. इरफान ‘अंग्रेजी मिडियम’ मध्ये दिल्लीस्थित व्यावसायिक राज बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे.  भारतीय शिक्षण पद्धतीचा फ्रेश टेक या सिनेमात बघायला मिळेल. आजारपणानंतर इरफानचा पहिलाच सिनेमा असल्याने चाह्त्यांना या सिनेमाबाबत उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive