सलमान खान आणि रोहित शेट्टी करणार का एकत्र सिनेमा, जाणून घ्या सविस्तर

By  
on  

भॉलिवूड भाईजान सलमान खान इंडस्ट्रीतला सर्वात बिझी आणि अनेक दशकं नंबर वनचा सुपरस्टार आहे. सध्या त्याच्या आगामी भारत सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये तो प्रचंड मश्गूल झालाय. पुढच्याच आठवड्यात म्हणजे ईदच्या मूहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्राणेच सलमान भारतमधून प्रेक्षकांमध्ये आणि बॉक्स ऑफीसवर दाणादाण उडवणार यात शंका नाही.

भारतनंतर दबंग खानच्या यादीत दोन सिनेमे हिटलिस्टवर आहेत, ते म्हणजे दबंग -3 आणि दुसरा आहे तो संजय लीला भन्साली यांचा आणि आलिया भटसोबतचा  इन्शाल्लाह आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ईद 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्तपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाईजानने एक खुपच रंजक माहिती दिली. तो म्हणाला, सध्या टागरच्या फ्रॅंचायजी असलेल्या 3 सिरीजवर काम करण्यापूर्वी मी काही स्क्रिप्ट्स वाचतो आहे आणि आवडली तर नक्कीच ते प्रोजेक्ट हाती घेईन.

तसंच ब-याच दिवसांपासून सलमान खान आणि अॅक्शन व कॉमेडीचा राजा रोहित शेट्टी हे एकत्र सिनेमा करणार का अशा अफवा सध्या जोरदार सुरु आहेत. ह्यावर सलमान म्हणतो, या अफवा का आहेत. मी आणि रोहीत दोघांनीही चर्चाविनीमय केला आहे. जर यातून काही चांगलं आऊटपूट निघालं तर नक्कीच आम्ही एकत्र सिनेमा करुन शकतो.

Recommended

Loading...
Share