By  
on  

आयुष्यात अजून बरंच काही करण्यासारखं, बायोपिक इतक्यात नाही: माधुरी दीक्षित

बॉलिवूडच्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितने रसिकांच्या मनावर अनेक वर्षं गारुड केलं आहे. हिंदी सिनेमांवर राज्य करणा-या माधुरीने मराठी सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या कलंकमधून माधुरीच्या अदाकारीचं दर्शन घडलं होतं. या दरम्यान माधुरीच्या बायोपिकवर काम सुरु असल्याची बातमीही समोर आली होती. पण माधुरीने या बातमीचं खंडन केलं आहे.

या बातमीविषयी माधुरी म्हणते, ‘कोणताही बायोपिक येत नाहीये. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अफवा आहे. माझ्यावर बायोपिक बनावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. आयुष्यात अजून बरंच काही करण्यासारखं आहे. मी त्यावर काम करत आहे. त्यामुळे माझ्या बायोपिकच्या बतमीत कोणतंही तथ्थ्य नाही.’ काही वर्षांपुर्वी माधुरीच्या अमेरिकेतील वास्तव्यावर एक विनोदी सिरीज बनवली जाणार होती. या सिरीजमध्ये माधुरी आणि प्रियांका चोप्रा एकत्र झळकणार होत्या. यावर माधुरी म्हणते, ‘सध्या याबद्दल काहीच सांगू शकत नाही, पण भविष्यात काय आहे आपल्या कुणालाच माहिती नाही.’ माधुरी सध्या ‘डान्स दिवाने’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive