या विनोदी सिनेमात एकत्र झळकणार यामी गौतम आणि दिलजीत दोसांझ

By  
on  

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब' या सिनेमातून अभिनेता दिलजीत दोसांझने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. दिलजीत दिनेश विजन दिग्दर्शित कॉप कॉमेडी ‘अरुण पटियाला’ आणि करण जोहरच्या आगमी 'गुड न्यूज' या सिनेमात झळकणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिलजीत एका आगामी विनोदी सिनेमात अभिनय करणार आहे. या सिनेमाची निर्मिती रमेश तौरानी करत असून अभिनेत्री यामी गौतम या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं नाव अजून ठरलं नाही.

अजीज मिर्झा यांचा मुलगा हारून या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अजीज यांनी याआधी 'राजू बन गया जेन्टलमेन', 'येस बॉस' यांसारख्या सुपरहीट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

या आगामी सिनेमाविषयी रमेश तौरानी म्हणाले की,''दिलजीत आणि यामी यांनी या सिनेमासाठी होकार दिला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हि नवी जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. हे दोघंही उत्तम कलाकार असून दोघांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे.''

तसेच या सिनेमासाठी एका नवीन अभिनेत्रीचा सुद्धा शोध सुरु आहे. तसेच या सिनेमाशी संबंधित इतर कलाकारांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. हा सिनेमा नीरज वोरा यांच्या शेवटच्या सिनेमांपैकी एक आहे. नीरज वोरा यांनी हेराफेरी आणि भूलभुलैया सारख्या सिनेमांची पटकथा लिहिली होती. २०१७ साली नीरज वोरा यांचं निधन झालं.

हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून दिलजीत आणि यामी हि नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, हे येणाऱ्या काळात कळून येईल.

Recommended

Loading...
Share