By  
on  

मंदना करीमी आणि सनी लियोनी यांचा हॉरर कॉमेडी सिनेमात दिसणार जलवा

प्रेक्षकांना ‘कोकाकोला’ या सिनेमातून बॉलिवूडच्या दोन हॉट अभिनेत्रींचे जलवे बघायला मिळणार आहे. या सिनेमात मंदना करीमी आणि सनी लियोनी एकत्र दिसणार आहे. मंदना यात नकारात्मक भूमिकेत आहे. तर या सिनेमात सनी लिओनी मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रसाद ततिनेनि हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

महेंद्र धारीवाल आणि परमदीप सिंह संधू यांची निर्मिती असलेला हा सिनेमा जूनमध्ये फ्लोअरवर जाईल. मंदना म्हणते, ‘या सिनेमासाठी खुप कष्ट घेतले आहेत मी वजन देखील बरंच कमी केलं आहे. ही भूमिका माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे.’ मंदना आणि सनी यांची भेट बिग बॉसच्या दरम्यान झाली होती. ‘क्या कूल हैं हम 3’, ‘मैं और चार्ल्स’ आणि ‘रॉय’ या सिनेमानंतर मंदनाने गौरव गुप्ता याच्याशी लग्न केलं होतं. पण काही कारणाने वेगळे झाले होते.

 

Recommended

PeepingMoon Exclusive