By  
on  

EXCLUSIVE: ‘सुर्यवंशी’मध्ये रोहित शेट्टी शूट करणार नेहमीपेक्षा हटके स्टंट

बॅंकॉक येथील ‘सुर्यवंशी’च्या सेटवरून ‘पीपिंगमून’ला रंजक माहिती मिळाली आहे. सिनेमाच्या दुस-या शेड्युलसाठी सिनेमाची टीम बॅंकॉक येथे आहे. दरवेळी सिनेमात कार्स आणि एसयुव्ही अणि जीप उडवणा-या रोहितच्या सिनेमात यावेळी हटके स्टंट पाहायला मिळणार आहे. यावेळी रोहित स्टंटसाठी बाईकचा वापर करणार आहे. यासाठी अक्षयनेही कंबर कसली आहे.

अक्षयसाठी कोणताही स्टंट मोठा नाही. पण हा सीन परिपुर्ण होण्यासाठी अक्षयने काही दिवसांचं ट्रेनिंगही घेतलं आहे. अक्षय या सिनेमात एसीपी वीर सुर्यवंशीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.  या सिनेमात अक्षयसोबत कतरिना झळकणार आहे. या सिनेमात अक्षय एक स्टायलिश कॉप साकारताना दिसणार आहे. रोहितच्या या कॉप युनिव्हर्समध्ये सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सिंबा’ अणि आता सुर्यवंशीचा समावेश आहे. या सिनेमाचं तिसरं शेड्युल गोव्यामध्ये सुरु होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive