By  
on  

आमिर खानच्या ऑफीसबाहेर बेळगाव येथील एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ऑफीसबाहेर मंगळवारी एक अघटित घटना घडली. आमिर खानला भेटायला आलेल्या एका चाहत्याने अचानक ऑफीसमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तेथील तैनात सुरक्षा रक्षकाने त्याला यासाठी अटकाव केल्यानंतर या 33 वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि एकच खळबळ उडाली.

पोलिसांना या तरुणाची ओळख पटली असून तो कर्नाटकमधील बेळगावचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं आहे. मोहम्मद कासिम असं या तरुणाचं नाव असून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात त्याच्याकडे असलेल्या कल्पना आणि योजना आमिर खानला सांगणे, हा त्याचा या भेटीमागचा उद्देश होता असं त्यानं पोलिसांना सांगितलं. तसंच तो तरुण पुढे असंही म्हणाला, आमिर खान यांनी ग्रामीण भागात दुष्काळाशी दोन हात करण्याकरिता पाणी फाऊंडेशनतर्फे जे उपक्रम राबवितात त्याप्रमाणे त्यांना यातसुध्दा रुची वाटेल म्हणून मला त्यांच्या भेटीची तळमळ होती.

पोलिसांनी याप्रकरणी या तरुणाच्या कुटुंबियांशी बेळगाव येथे संपर्क साधून संपूर्ण चौकशी केली आणि लवकरच त्याला त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive