कतरिना कैफला वाटतं रणवीर सिंगसोबत तिची जोडी दिसेल सर्वात चांगली

By  
on  

रणवीर सिंग कितीही अतरंगी कलाकार असला तरी अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला उत्सुक आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाने अलीकडेच रणवीरसोबत काम करायची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे. कतरिना अलीकडे नेहा धुपियाच्या  'Vogue BFF' या चॅटशोमध्ये आली होती. त्यावेळी तिने सांगितलं रणवीर आणि टायगरसोबत तिला काम करायचं आहे.

या शो च्या फन सेगमेंटमध्ये ज्यावेळी नेहाने कतरिनाची मैत्रीण अनाईता अदजानियाला विचारलं की कतरिनाची जोडी रणवीर किंवा टायगर यापैकी कुणासोबत चांगली दिसेल यावर कतरिनाने पटक्न उत्तर दिलं की तिला दोघांसोबत काम करायला आवडेल. अर्थात टायगरसोबत अ‍ॅक्शन तर रणवीरसोबत अतरंगी भूमिका साकारायला आवडेल असंही तिने नमूद केलं. काही दिवसांपुर्वीच विकी कौशलने कतरिनासोबत काम करायचं असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. कतरिना सध्या ‘भारत’सिनेमात सलमानसोबत झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share