रिलीजच्या आधीच 'भारत' सिनेमाला बसले 24 कट्स, कारण जाणून घ्या

By  
on  

या वर्षीचा बहुचर्चीत सिनेमा 'भारत' प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सलमान खान आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर या सिनेमाची शेवटची कामं करत आहेत. परंतु एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार अली अब्बास जाफर यांनी या सिनेमाला २४ प्रसंग कापून टाकले आहेत.

या सिनेमाला काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून UA सर्टिफिकेट मिळालं आहे. हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर अलीने या सिनेमाला २४ कट्स लावले आहेत. भारत सिनेमाची लांबी ३ तासांहून अधिक झाली होती. त्यामुळे दिग्दर्शकाने या सिनेमातील काही प्रसंग काढून टाकले.

सूत्रांच्या माहितीनुसार मागील आठवड्यात सलमान खानने आपल्या मित्रांसाठी आणि कुटुंबियांसाठी या सिनेमाचा विशेष शो आयोजित केला होता. त्यानंतर हा शो पाहिल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी या सिनेमाचं कौतुक केलं. तसेच या सिनेमाची लांबी १६५  मिनिटांपेक्षा कमी ठेवावी हा सल्ला दिला.

या सल्ल्यावर गांभीर्याने विचार करून अली अब्बास जाफरने 'एथे आ', 'चाशनी' आणि 'तुरपेया' या तीन गाण्यांना आवश्यक तेथे कात्री लावली. त्यामुळे आता या सिनेमाची लांबी १५५ मिनिट एवढी झाली आहे.

ही गोष्ट ध्यानात ठेऊन सेन्सॉर बोर्डाला कॉपी पाठवताना 'वर्क इन प्रोग्रेस' ही कॉपी सबमिट केली आहे. जेणेकरून सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या सिनेमाची फायनल एडिटिंग करत येईल.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला भारत हा सिनेमा येत्या ५ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=Ea_GKoe81GY

Recommended

Loading...
Share