By  
on  

तैमुरसह सैफिना ची इटलीवारी, शेअर केले हे क्युट फोटो

मोस्ट फेव्हरेट स्टारकिडचा किताब मिळवलेला तैमुर सध्या इटलीत आई-वडिलांसह सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. या स्टार फॅमिलीचे हॉलिडे क्लिक्स व्हायरल होत आहेत. करीनाची स्टायलिस्ट पुनम अदमानियाने हे फोटो व्हायरल केले आहेत. या फोटोत करीना आणि सैफचा कूल अंदाज दिसत आहे. या करीनाने फ्लोरल वनपीस घातला आहे. तर सैफने लाईनिंगचा टीशर्ट घातला आहे. यातील एका फोटोत तैमुरही दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByOzoJej9wP/?utm_source=ig_web_copy_link

असं सांगितलं जात आहे की हे कपल इटलीदौ-यानंतर क्रिकेट वर्ल्डकपचा आनंद घेण्यासाठी लंडनला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक उन्हाळयात हे कुटुंब सुट्ट्या घालवण्यासाठी जात असतं. यावेळी कामाचा ताण बाजूला ठेवून करीना, सैफ आणि तैमुर फॅमिली टाईम एंजॉय करताना दिसतात. सैफ सध्या लवकरच सेक्रेड गेम्सच्या दुस-या भागातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. करीनाही लवकरच डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive