By  
on  

प्रियांका चोप्राला व्हायचंय भारताची पंतप्रधान

लग्नानंतर परदेशी झालेली आपली देसी गर्ल प्रियांका चोप्राची एक अनोखी इच्छा आहे. ती ऐकून तुम्हीसुध्दा आश्चर्यचकित व्हाल. प्रियांका चोप्राला पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला आवडेल असं मत तिने, एका कार्यक्रमादरम्यान नुकतंच व्यक्त केलं होतं.

आयएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका चोप्रा आणि तिचे पती निक जोनास यांना राजकारणात स्वारस्य असल्याचे म्हटले आहे. तसंच चांगलं परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण राजकीय क्षेत्रात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचंही प्रियांकाने स्पष्ट केलं आहे.

‘मला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायला आवडेल आणि निकने अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरावे अशी माझी इच्छा आहे’ असे प्रियांका म्हणाली.

Recommended

PeepingMoon Exclusive