By  
on  

सलमान खान म्हणतो, मला अविवाहीत राहायलाच आवडेल

सलमान खान सध्या त्याच्या ‘भारत’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये व्यस्त आहे. कतरिनासोबत तो प्रत्येक ठिकाणी ‘भारत’च्या प्रमोशनला हजेरी लावत आहे. सलमान आणि कतरिना या जोडीला बघण्याची उत्सुकता आहे. हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रमोशन दरम्यान कतरिना आणि सलमान यांच्यातील खास बाँडिंग दिसून आलं. सलमान कधी कतरिनाची साडी नीट करताना दिसला तर कधी माध्यमांसमोर तिचं कौतुक करताना दिसला.

 

प्रमोशनदरम्यान सलमानने अनेक विषयांवर माध्यमांशी खुलेपणाने चर्चा केली. यावेळी सगळ्यात महत्त्वाचा होता तो त्याच्या लग्नाचा मुद्दा. सलमान कधी लग्न करणार याविषयी माध्यमांनी त्याला खोदून खोदून विचारलं असता त्याने यावर मत व्यक्त केलं. सलमान म्हणतो, ‘ माझा लग्नसंस्थेवर अजिबात विश्वास नाही. ही बाब आता जुनी होत चालली आहे. पण माझा मैत्रीवर विश्वास आहे.’ सलमानला सिंगल पॅरेंट होण्याबद्दल छेडलं असता तो म्हणतो, हे घडायचं असेल त्यावेळी घडेलच.’

 

Recommended

PeepingMoon Exclusive