By  
on  

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर काळाच्या पडद्याआड

आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी टीव्हीवरील बहुचर्चीत अशा 'खिचडी' आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा' यांसारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून दिनयार हे अनेक आजारांनी आणि व्याधींनी ग्रस्त होते. आज दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याचवर्षी दिन्यार यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आले.

दिनयार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून सुरु केली. त्यांनी हिंदी तसेच गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी 'बाजीगर', '36 चाइना टाउन', 'खिलाड़ी', 'बादशाह' यांसारख्या सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. सिनेमांसोबतच त्यांनी टीव्हीचा पडदासुद्धा आपल्या अभिनयाने गाजवला.

Recommended

PeepingMoon Exclusive