आपल्या सिनेमांतील भव्यतेसाठी आणि साहसी दृश्यांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी खूप मेहनत घेत असतो हे सर्वांना माहीत आहे. हीच बाब अक्षय कुमारच्या बाबतीतसुद्धा लागू होते. आता हे दोघं आगामी 'सूर्यवंशी' सिनेमासाठी एकत्र काम करणार आहेत.
नुकतंच अक्षयने आपल्या ट्विटरवरून 'सूर्यवंशी' सिनेमासंबंधी एक फोटो शेयर केला असून या फोटोत अक्षय एका चालू हेलिकॉप्टरच्या पायथ्याशी लटकला असून त्याखाली रोहित शेट्टी बाईक चालवताना दिसत आहे. हा थरारक फोटो पाहून अक्षयच्या चाहत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.
Casually hanging, off a helicopter...just another day on the sets of #Sooryavanshi
P.S. Do NOT try this on your own, all stunts are performed under expert supervision pic.twitter.com/0zeDLeks5q
— Akshay Kumar (@akshaykumar) June 5, 2019