By  
on  

बिग बॉस मराठी 2 : साताऱ्याचे कंदी पेढे भोवणार का पराग कान्हेरेला ?

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात नुकताच 'पोपटाचा पिंजरा' हा टास्क संपन्न झाला. या टास्कमध्ये बिचुकलेंनी परागचा पोपट पिंजऱ्यात टाकला. अर्थात बिचूकलेंनी परागला या आठवड्यासाठी नॉमिनेट केले.

परागला याबाबत कोणताही आश्चर्य वाटलं वाटलं नाही. संपूर्ण टास्कमध्ये तो बिचुकले यांना काही बोलला नाही. परंतु हा टास्क संपूर्ण झाल्यानंतर परागने बिचूकलेंच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना कॅमेरासमोर घेऊन गेला. आणि तो म्हणाला,''सातारकरांनो कंधी पेढे तयार ठेवा. या आठवड्यात हे वाचले तयारी तुमचे लाडके नेते दोन आठवड्यात तुम्हाला भेटायला नक्की येणार.'' आणि पराग तिथून निघून गेला.

 

 

परागचं हे वागणं बिचूकलेंना अनपेक्षित होतं. यानंतर बिचूकलेंना राग अनावर झाला. त्यांनी आपली चीड घरातल्या इतर सदस्यांसमोर व्यक्त केली. त्यावेळी सुरेखा पुणेकर, शिवानी सुर्वे, माधव देवचके यांनी बिचुकलेचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

आता बिचुकले परागच्या या वागण्याला कसं प्रत्युत्तर देतात हे बिग बॉसच्या घरात येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive