अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' करणार या खलनायकाशी मुकाबला

By  
on  

अक्षय कुमार सध्या बँकॉक आणि थायलंड येथे आपल्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षयसोबत कतरीना कैफ सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. परंतु या सिनेमात अक्षय समोर खलनायक म्हणून कोण असणार हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून गुलशन ग्रोव्हर हे या सिनेमात व्हिलन साकारणार आहेत.

बॉलीवूडमध्ये 'बॅडमॅन' म्हणून लोकप्रिय असलेले गुलशन ग्रोव्हर हे 'सूर्यवंशी' सिनेमात खलनायक साकारणार आहेत. तसेच अभिमन्यू सिंग आणि निकीतीन धीर हे कलाकार सुद्धा या सिनेमात नकारात्मक छटा असलेली पात्र रंगवत आहेत.

याबाबत गुलशन यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले,''रोहित कायम लार्जर दॅन लाईफ असे सिनेमे बनवत असतात. त्याची ही पद्धत मला आवडते. तसेच रोहितचे सिनेमे तांत्रिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असतात.'' गुलशनने याआधी अक्षयसोबत 'मंत्रा'(१९९४) आणि 'हेरा फेरी'(२०००) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

रोहित शेट्टी स्वतःच्या सिनेमांमधून कॉप युनिव्हर्स बनवत असून सूर्यवंशी सिनेमात 'सिंघम' आणि 'सिम्बा' म्हणजेच अजय देवगण आणि रणवीर सिंग हे सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे.

 

Recommended

Loading...
Share