By  
on  

यासाठी करीना निवडत नाही तैमुरसाठी डिझायनर ड्रेसेस, जाणून घ्या

करीनाने अलीकडेच प्रसिद्ध व्होग इंडिया मासिकाला मुलाखत दिली होती. यावेळी तिने अनेक वैयक्तिक बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी तिने सैफ आणि तैमुरविषयीही अनेक गोष्टी विषद केल्या. एकीकडे करीना सध्याची फॅशनिस्टा आहे तर सैफ मात्र तिच्या अगदी विरोधात आहे. सैफला ब्रॅंडेड किंवा लेबल्ड कपडे वापरायला अजिबात आवडत नाहीत. याशिवाय तैमुरनेही असे कपडे वापरु नयेत याकडे त्याचं लक्ष असतं.

यावेळी तिला विचारलं गेलं की फॅशनच्या बाबतीत ती सैफचं मत आजमावते का? यावर तिने उत्तर दिलं की, ‘हो मी सैफचा सल्ला जरूर घेते. साडी किंवा काही ग्लॅमरस घालायचं असेल तर मी जरूर सैफचं मत घेते. तो लेबल्सच्या सक्त विरोधात असतो. त्यामुळेच तैमुरलाही तो ब्रॅंडेड किंवा लेबल्ड कपडे वापरु देत नाही. त्यामुळे एरवी देखील मी त्याला टी -शर्ट आणि शॉर्टसच घालू देते. ही सेलिब्रिटी फॅमिली सध्या इटलीच्या दौ-यावर आहे. तेथील फोटोंना सोशल मिडियावर लाईक्स मिळत आहेत. सैफ सध्या लवकरच सेक्रेड गेम्सच्या दुस-या भागातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. करीनाही लवकरच डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive