By  
on  

दीपिका 'छपाक'मधील व्यक्तिरेखा समरसून जगली आहे : मेघना गुलझार

२५ मार्च पासून दीपिका पादुकोणने स्वतःच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतंच दीपिकाने मेघना गुलझार आणि विक्रांत मस्य यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करून या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. या फोटोमध्ये या सिनेमाचे सर्व कास्ट आणि क्रू सदस्य सुद्धा दिसत आहेत.

मेघना गुलझार या एक वर्षांपासून जास्त काळापासून या सिनेमावर काम करत आहेत. त्या याबाबतीत म्हणाल्या, ''सुरुवातीपासूनच या सिनेमाचं शूटिंग आम्हाला ४३ दिवसांच्या आत संपवायचं होतं.'' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी रिलीज होणार असून या सिनेमाचं संकलन आणि संगीत आदी महत्वाची कामं बाकी आहेत.

''या सिनेमाची शूटिंग संपणं माझ्यासाठी खूप भावनिक होतं. या सिनेमाशी संबंधित सर्वांनी या सिनेमाला आपलंस केलं  आहे. दीपिकाने मालतीची व्यक्तिरेखा स्वतःमध्ये इतकी भिनवली आहे की दीपिका मालतीची भूमिका समरसून जगली आहे.''अशा भावना या सिनेमासंबंधी मेघना गुलझार यांनी व्यक्त केल्या.

दीपिकाचं कौतुक करताना मेघना म्हणाल्या,''एक अॅसीड अटॅक पिडीत मुलीचा लुक देणं दीपिकासाठी फार कठीण होतं. रोज या लूकची तयारी करताना दीपिकाला दीड तास लागायचा. परंतु कॅमेरासमोर दीपिका सळसळत्या ऊर्जेने काम करायची.''

यापुढे त्या म्हणाल्या,''लोकांनी हा सिनेमा डोळे बंद करून पाहू नये हि माझी इच्छा नव्हती. दीपिकाला अॅसीड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालचा विशेष लुक द्यावा हा माझा उद्देश नव्हता. अॅसीड अटॅकमुळे एका व्यक्तीचा चेहरा कसा बदलतो हा माझा उद्देश होता.''

हा सिनेमा दीपिकाच्या आजवरच्या कारकिर्दीतील अत्यंत वेगळा आणि महत्वाचा सिनेमा मानला जात आहे. 'तलवार', 'राझी' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या मेघना गुलझार हे या सिनेमाच दिग्दर्शन करणार आहेत.

दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला मेघना गुलझार दिग्दर्शित 'छपाक' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive