बेगम करीना कपूर खान यादिवशी करणार ‘तख्त’च्या शुटिंगला सुरुवात

By  
on  

सतत लाईमलाईटमध्ये कसं रहायचं हे सैफच्या बेगमला म्हणजेच करीना कपूर खानला चांगलंच माहिती आहे. नुकतेच तिचे इटली ट्रीपचे फोटोही व्हायरल होत आहेत. ट्रीपनंतर बेबो पुन्हा शुटिंग जॉईन करणार आहे. अलीकडेच तिने एक खुलासा केला आहे. बेबो करण जोहरच्या ‘तख्त’मध्ये  दिसणार आहे. मल्टीस्टारर ‘तख्त’चं शूट ती येत्या डिसेंबरपासून सुरू करणार आहे. करीना तख्तमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

एका दैनिकाशी बोलताना करीनाने हा खुलासा केला आहे. करीना आणि करण ‘कभी खुशी कभी गम’ नंतर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तख्तमध्ये करीनाशिवाय आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, अनिल कपूर, भूमि पेडणेकर आणि जान्हवी कपूर हे कलाकारदेखील दिसणार आहेत. तख्तच्या निमित्ताने करीना आणि करण जवळपास १८ वर्षांनी एकत्र दिसत आहेत. करीना या सिनेमाबाबत खुप उत्साहित असल्याचं दिसून आलं. करीना सध्या ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोचं परीक्षण करणार आहे. तसंच ती अ‍क्षयसोबतच्या गुड्न्युज सिनेमातूनही रसिकांच्या समोर येणार आहे. तख्त डिसेंबर २०२०मध्ये रसिकांच्या भेटीला येईल.

Recommended

Loading...
Share