यासाठी शाहिद आला नव्हता करीना-सैफच्या लग्नात, या शोमध्ये सांगितलं कारण

By  
on  

अलीकडेच अभिनेता शाहिद कपूरने नेहा धुपियाचा शो BFFs with Vogue मध्ये हजेरी लावली. तो ‘कबीर सिंह’च्य प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. यावेळी त्याने एक्स-गर्लफ्रेंडस सोबत करीअरमधील अनेक चुकांची उजळणी केली.

 

शोमध्ये त्याला जेव्हा करीनाच्या लग्नात हजेरी न लावण्याबाबत विचारलं गेलं. त्यावेळी त्याने मन मोकळं केलं तो म्हणतो, मला फारसं काही आठवत नाही. पण या लग्नाचं मला आमंत्रण नसावं. पण प्रियांकाने मात्र मुंबई रिसेप्शनमध्ये त्याला आमंत्रित केलं होतं. जिथं तो पत्नी मीरासह पोहोचला होता. यावेळी शाहिद सिनेमा निवडीच्या चुकांबद्दलही बोलला. तो म्हणतो ‘रंग दे बसंती’मधील सिद्धार्थची व्यक्तिरेखा त्याला ऑफर झाली होती. त्याला ती खुप आवडली पण होती. पण काही कारणास्तव तो हा सिनेमा स्विकारू शकला नव्हता. शाहिद कबीर सिंह सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा २१ जूनला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share