शाहिद म्हणतो, असं वागलो तर मीरा मला घरातून बाहेर काढेल

By  
on  

सध्या चर्चा आहे ती ‘कबीर सिंह’ उर्फ शाहिद कपूरची. शाहिदचा हा सिनेमा २१ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे. शाहिदसोबत या सिनेमात कियारा आडवाणीची भूमिका आहे. तेलुगु सिनेमा अर्जून रेड्डीचा रिमेक असलेल्या या सिनेमात शाहिद एका सर्जनच्या भूमिकेत आहे. शाहिद आणि कियारा सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मुंबईमध्ये प्रमोशनवेळी पत्रकारांशी संवाद साधताना शाहिदने त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. यावेळी शाहिदला विचारलं गेलं की कबीर सिंग बनल्यानंतर पुन्हा शाहिद कपूर बनणं किती अवघड होतं? त्यावर शाहिद म्हणतो, मला पॅकनंतर कबीरला सोडून शाहिद व्हायला लागायचं. कारण घरी गेल्यावर पत्नी आणि मुलं माझी वाट पहात असायची. जर कबीर सिंगच्या व्यक्तिरेखेत घरी गेलो असतो तर मीरा मला घरातून बाहेर काढेल.'

 

यानंतर शाहिदला विचारलं गेलं की, कधी कोणत्या व्यक्तिरेखेची वैयक्तिक आयुष्यात सवय लागली आहे का? यावर शाहिद म्हणतो की, नशीबाने मी थोडासा प्रॅक्टीकल अभिनेता आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मी दोन्ही भूमिका व्यवस्थित निभावू शकतो.’ आता शाहिदच्या या हटके भूमिकेला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात ते लवकरच कळेल.

 

Recommended

Loading...
Share