By  
on  

तनुश्रीने नानाला मिळालेल्या क्लीन चीट प्रकरणी असा केला संताप व्यक्त

देशभरात ज्याची चर्चा सगळ्यात जास्त चर्चा होती ते प्रकरण म्हणजे ‘मीटू’ प्रकरण’. विशेष म्हणजे नाना पाटेकर सारख्या मातब्बर कलाकारावर या प्रकरणात आरोप झाले होते. पण आता या प्रकरणात नानाला क्लीन चीट मिळाल्याचं समोर आलं आहे. नानाच्या विरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला क्लीन चीट मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. भ्रष्ट पोलिस आणि भ्रष्ट कायदे व्यवस्थेकडून अतिभ्रष्ट नानांना क्लीनचीट दिल्याचं म्हणत तनुश्रीनं या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

 

तनुश्रीच्या वकिलांनी देखील याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नानांना वाचवण्यासाठी या प्रकरणात पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप तनुश्रीच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणाला २०१८मध्ये सुरुवात झाली होती. हॉर्न ओकेच्या सेटवर घडलेल्या तथकथित प्रकरणामुळे तनुश्रीने नानावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार दिग्दर्शकांवर मीटू अंतर्गत आरोप झाले होते.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive