By  
on  

बॉलिवूडमधील ही ‘बापमाणसं’ आहेत ‘सिंगल पॅरेंट, पाहा कोण कोण आहेत यात

पालकत्व हे समजण्यास आणि निभावण्यास काहीसं कठीण असतं. लहान मुल वाढवताना जोडीदाराचा खंबीर आधार असेल तर ही जबाबदारी सुकर बनते. पण बॉलिवूडमध्ये अशीही काही बापमाणसं आहेत जी एकट्याने मुलं वाढवत आहेत. या कूलेस्ट वडिलांसाठी हा ‘फादर्स डे’ अतिशय खास असेल यात शंका नाही. पाहुयात बॉलिवूडचे कोणकोणते कलाकार यात आहेत.

तुषार कपूर : 
सरोगसीच्या माध्यमातून ‘लक्ष्य’ मुलाचा पिता बनलेल्या तुषार कपूरने आपण उत्तम पिता आहोत हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. लक्षचा चेहरा हुबेहूब वडिलांसारखा दिसतो. तुषारने यापुर्वीही वडिल होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण त्याला दत्तक घेण्याचा पर्याय पसंत नसल्याने त्याने सरोगसीचा पर्याय निवडला आहे. 

हृतिक रोशन : 
बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन कुलेस्ट डॅडी आहे. पत्नी सुझानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर हृतिकने रेहान आणि -हीदान या दोन्ही मुलांची जबाबदारी स्विकारली. हृतिक या दोघांसोबतच्या क्वालिटी टाईमचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतो. 

 

कमल हासन : 
सिंगल फादर्सच्या यादीत कमल हासनचे नाव सगळ्यात वर आहे. कमलने सारिकाशी झालेल्या घटस्फोटानंतर अक्षरा आणि श्रुती या मुलींना एकट्याने वाढवलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You showed a lot of love and talent this day. More coming your way. @shrutzhaasan #BiggBossTamil2

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan) on

 

करण जोहर : 
करण जोहरला पॅरेंटिंगच्या बाबत शंभर पैकी शंभर मार्क द्यायला हवेत. कारण करण जुळ्या मुलांचा बाबा आहे. त्याच्या यश आणि रुहीचे गोड फोटो तो सोशल मिडियावर सतत शेअर करत असतो. 

राहुल देव : 
अनेक सिनेमांमध्ये व्हिलनची व्यक्तिरेखा साकारणारा राहुल सिंगल फादर आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. राहुलच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याने एकट्याने मुलाचा सांभाळ केला आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive