परिणीती चोप्राने शेअर केला बॅटमिंटन प्लेअर लूकमधील फोटो

By  
on  

सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये आता श्रद्धा ऐवजी परिणीती दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता सायनासारखं बनायचं म्हटल्यावर परिणीतीने बॅटमिंटन कोर्टावर घाम गाळायला सुरुवात केली आहे. या शुटिंगला अजून अवकाश असल्याने परिणीती बॅटमिंटनची जोरदार प्रॅक्टीस करत आहे.

 

यासंबधीच्या ट्वीटमध्ये परिणीती म्हणते, ‘मी बॅटमिंटन खेळायला सुरुवात केली आहे.’ आम्ही ऑक्टोबरपासून सुरुवात करत आहोत. मी एकदा हे शिकले की मिळवलं. अजून चार महिने बाकी आहेत.’ यापुर्वी श्रद्धाने हा सिनेमा साईन केला होता. पण कोर्टवर मेहनत करूनही हवा तो परिणाम साधत नसल्याने तिने हा सिनेमा सोडला होता. तिची जागा परिणीतीने घेतली आहे. हा सिनेमा अमोल गुप्ते दिग्दर्शित करत आहेत. परिणीती याशिवाय ‘जबरिया जोडी २’मध्ये दिसून येणार आहे.

Recommended

Loading...
Share