'पानिपत' सिनेमात दिग्गज अभिनेत्री झीनत अमान साकारणार ही व्यक्तिरेखा

By  
on  

बॉलीवूड विश्वातील दिग्गज अभिनेत्री झीनत अमान आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या आगामी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत  झळकणार आहेत. एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार झीनत अमान एका महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष यांनी याबाबतीत खुलासा केला की, ''सकीना बेगम या सामंत महिलेची भूमिका झीनत साकारत आहेत. सकीना 'होशियारजंग' नावाच्या एका साम्राज्याची मुख्य महिला आहे. ही भूमिका कमी लांबीची असून सकीना सदाशिवभाऊ यांची मदत करताना दिसून येणार आहे.''

अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेला 'पानिपत' हा सिनेमा १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे मराठा सरदार आणि अफगाणी आक्रमकांमध्ये जे भीषण युद्ध झालं त्यावर आधारित आहे. 

या सिनेमात अर्जुन कपूर सदाशिव भाऊची व्यक्तिरेखा साकारात आहे. 'पानिपत'च्या निमित्ताने अर्जुन कपूर आणि संजय दत्त पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. तसेच अभिनेत्री कृती सेनॉन या सिनेमात प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा रंगवणार आहे. 

Recommended

Loading...
Share