By  
on  

या कारणासाठी सनी देओल शाहरुख खानसोबत गेली १६ वर्ष बोलत नाहीय

असा माणूस सापडणे दुर्मिळ की ज्याने शाहरुख खान आणि सनी देओल स्टारर 'डर' या सिनेमातला 'तू है मेरी किरण' हा संवाद बोलला नसावा. पण या सिनेमाशी संबंधित अशी एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहित आहे. या गोष्टीमुळे शाहरुख आणि सनी हे गेली १६ वर्ष एकमेकांसोबत बोलत नाहीयत. 

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सनी देओल शाहरुख खान सोबत बोलत नाहीच शिवाय त्याने 'डर' या सिनेमानंतर पुन्हा यशराज फिल्म्स सोबत काम केले नाही. यामागचं कारण सनीने वारंवार सांगितलं आहे. परंतु पुन्हा एकदा ही कटू आठवण सनीने शेयर केली. 

या गोष्टीविषयी सनी म्हणाला,''डर या सिनेमात मला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखला सुद्धा मिळाली. परंतु या सिनेमाची एक गोष्ट मला खटकली की, या सिनेमात खलनायकाला जास्त ग्लोरिफाय करण्यात आलं होतं. मी नेहमी सिनेमा करताना समोरच्या टीमवर विश्वास ठेऊन काम करतो. परंतु ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्यात आली याचं मला वाईट वाटलं.''

सध्या सनी आणि शाखरूखचे चाहते त्यांच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive