सैफ अली खानच्या आगामी 'जवानी जानेमन' सिनेमात करीना झळकणार विशेष भूमिकेत?

By  
on  

सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही बॉलीवूडमधली हॉट जोडी सतत चर्चत असते. सध्या सैफ अली खानच्या आगामी 'जवानी जानेमन' सिनेमाची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगत आहे. या सिनेमामधून अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलीया फर्निचरवाला बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार 'जवानी जानेमन' या सिनेमात सैफ अली खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खानसुद्धा विशेष भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने करीना कपूर चार वर्षानंतर एका विशेष भूमिकेत तिच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अलीकडेच करीना लंडनयेथे सैफसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Loveee loveee loveeee ️️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात करीना सैफ साकारत असलेल्या भूमिकैची पूर्वपत्नी अथवा पूर्वगर्लफ्रेंड च्या व्यक्तिरेखेत असण्याची शक्यता आहे. हे दोघं  याआधी 'हॅप्पी एंडिंग्स' या सिनेमात एकत्र झळकले होते. 

 

Recommended

Loading...
Share