अभिनेत्री कृती सॅनोन होणार पत्रकार, वाचा सविस्तर

By  
on  

शाहरुख खान स्टारर 'रईस' या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल ढोलकीया लवकरच आपल्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राहुल ढोलकीया लवकरच नव्या थ्रिलर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 

या सिनेमात कृती सॅनोन एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातली व्यक्तिरेखा कृतीला खूप आवडली आहे. कृती या सिनेमात महिला पत्रकाराची भूमिका साकारत असून ही भूमिका चांगली रंगवण्यासाठी कृतीने रिसर्च सुरु केला आहे. 

 

याबाबतीत कृतीला विचारलं असता ती म्हणाली,''अतिशय सशक्त अशी ही स्त्री भूमिका आहे. प्रेक्षक या भूमिकेला स्वतःच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करतील.''

या सिनेमाच्या तयारीसाठी निर्माते सुनीर यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खास वर्कशॉप ठेवलं आहे. २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

 

कृती याआधी 'लुका छुपी' या सिनेमात झळकली होती. या सिनेमातील कृतीच्या भूमिकेचं सर्वच स्तरांमधुन कौतुक झालं. 

Recommended

Loading...
Share