अखेर ठरलं तर! अक्षयने कुमारने दिला 'टिप टिप बरसा पानी' रिक्रिएट होण्याला दुजोरा

By  
on  

मागील काही दिवसांपुर्वी पिपिंगमुनने अक्षय कुमारच्या आगामी 'सूर्यवंशी' या सिनेमात 'मोहरा' या सिनेमातलं 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट होणार असल्याची बातमी दिली होती. 

नुकतंच अक्षयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना हे गाणं रिक्रिएट होण्याची खुशखबर दिली. आणि निर्माते रतन जैन यांचे आभार मानले. त्यामुळे पुन्हा एकदा या गाण्याची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

 

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ झळकणार असून २७ मार्च २०२० रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share