By  
on  

इम्रान हाश्मीने शेअर केला ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक

अलीकडेच अमिताभ बच्चनने ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला होता. आता इम्रान हाश्मीने ‘चेहरे’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये इम्रानचा हटके अंदाज दिसून येत आहे. या फोटोचं कॅप्शन म्हणून त्याने शायरी लिहिली आहे. तो म्हणतो,

लाख लगादे ज़माना उजालों पे पेहरे

शमा से भी होते हैं रोशन चेहरे - रूमी जाफ़री

 

शिमल्यातील बंगल्यात निवांत क्षण घालवणारा मित्रांचा ग्रुप एक सायकोलॉजिकल गेम खेळतो. यावेळी घडणा-या घडामोडी या सिनेमाला रंजक बनवतात. या सिनेमात इम्रान हाश्मी आण अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. याशिवाय कृती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ कपूर, ड्रिटमैन चक्रवर्ती, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड यांची निर्मिती आहे. रुमी जाफरी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. हा सिनेमा २१ जानेवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive