जपानमध्ये दिमाखात फडकणार अक्षयच्या ‘केसरी’चा झेंडा

By  
on  

सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर अवलंबून असलेला सिनेमा म्हणजे ‘केसरी’. शिखांच्या अतुल्य साहसाचा प्रत्यय देणा-या या सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. भारतात कौतुक कमावल्यानंतर हा सिनेमा आता जपान वारीला निघाला आहे.

खुद्द अक्षयनेच ही माहिती सोशल मिडियाद्वारे दिली आहे. ‘’जगातील सर्वात धाडसी लढायांपैकी एका सारागढीच्या लढाईवर आधारलेला सिनेमा म्हणजे केसरी, १००० शत्रूंविरोधात २१ सैनिक जपान जिंकायला उत्सुक आहेत.’ या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंहने केलं होतं. अक्षयसोबत यात परिणीती चोप्रापण आहे.

झी इंटरनॅशनल स्टुडियोने हा सिनेमा जगभरात ५५ देशात रिलीज करण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या जपानमध्ये रिलीज होत आहे. ‘पॅडमॅन’नंतर अक्षयचा हा दुसरा सिनेमा जपानमध्ये रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share