By  
on  

#27YearsOfSRK: 'हिरो' ते 'झिरो', जाणून घ्या किंग खानच्या २७ वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीचा आढावा

बॉलीवूडच्या किंग खानच्या फिल्मी कारकीर्दीला आज २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण दररोज मुंबईत दाखल होतात. २७ वर्षांपूर्वी असाच एक मुलगा मुंबईत आला. आणि मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज सर्वजण त्याला 'किंग खान' या नावाने संबोधित करतात. तो म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतला बादशाह शाहरुख खान. 

१९८० साली टीव्ही मालिकांमधून पदार्पण करून शाहरुखने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर १९९२ साली 'दिवाना' या सिनेमातून शाहरुखने आपल्या फिल्मी करियरला दमदार सुरुवात केली. त्यानंतर मात्र शाहरुखने मागे वळून पाहिलं नाही.'डर', 'अंजाम', 'बाजीगर' यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन शाहरुखचा करियरचा आलेख उंचावत  राहिला.

१९९५ साली आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा शाहरुखच्या कारकीर्दीतील माईलस्टोन ठरला. या सिनेमाने शाहरुख खान हे नाव जगभरात लोकप्रिय झालं. २५ जुन १९९२ रोजी शाहरुखने भारतीय सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. आज २०१९ रोजी बादशहाच्या या फिल्मी करियरला २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

शाहरुखच्या फिल्मी  करियरचा घेतलेला हा आढावा 

   'दीवाना- 1992

 ‘बाजीगर- 1993

डर- 1993

करण अर्जुन- 1995

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे- 1995

‘दिल तो पागल है’- 1997

 ‘कुछ कुछ होता है’- 1998

‘मोहब्बतें’- 2000

‘अशोका’- 2001

‘देवदास’- 2002

‘कल हो ना हो’- 2003  

'मैं हूं ना’- 2004

‘वीर जारा’- 2004

‘स्वदेस’-2004

 

‘डॉन’- 2006

‘चक दे इंडिया’- 2007

‘ओम शांति ओम’- 2007

‘रब ने बना दी जोड़ी’- 2008

‘माय नेम इज खान’- 2010

'जब तक है जान'- 2012

‘चेन्नई एक्सप्रेस’- 2013

'फॅन'- 2016

‘डियर जिंदगी’-2016

'रईस'-2017

‘जीरो’-2018

 

आजही शाहरुख खान अनेक जाहिरातींच्या तसेच सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या सिनेमांतून नवनवीन प्रयोग करण्यासाठी शाहरुख नेहमी प्रयत्नशील असतो. भारतीय सिनेसृष्टीवरअधिराज्य गाजवणाऱ्या या बादशाहाला आपल्या कारकीर्दीची २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पिपिंगमुन मराठीतर्फे हार्दिक शुभेच्छा!

 

Recommended

PeepingMoon Exclusive