By  
on  

लग्न करत असल्याच्या अफवांना मी आता नकार देऊन थकलो आहे : वरुण धवन

मागील वर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अ‍डकले होते. यावर्षीही काही जोड्या लग्नाच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. त्यापैकी एक जोडी म्हणजे वरुण धवन- नताशा दलाल. वरुण-नताशा कधी लग्न करतात याची उत्सुकता सगळ्या बॉलिवूडला आहे. मध्यंतरी अशी चर्चा होती की, वरुणचा आगामी सिनेमा ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ काहीसा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे वरुण नताशा यांचं लग्नही या वर्षाखेरीस होण्याची शक्यता आहे.


 

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना वरुणने सगळ्या अफवांवर पुर्णविराम लावला आहे. तो म्हणतो, ‘लग्नाच्या अफवांचं खंडन करता करता मी थकलो आहे.’ यावर डेव्हिड धवन यांना विचारलं असता ते म्हणतात, ‘वरुणच्या फॅन्सप्रमाणेच कुटुंबियही त्याच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.’ वरुण अलीकडेच ‘कलंक’ सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट होती.

Recommended

PeepingMoon Exclusive