By  
on  

सलमान खानची साडेसाती संपेना, पत्रकाराला मारहाण प्रकरण पोहचलं कोर्टात

बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या मागची साडेसाती काही संपता संपत नाही. नेहमीच अनेक वादाच्या भोव-यात तो अडकतो. मागच्याच महिन्यात एप्रिलमध्ये एका पत्रकाराचा फोन त्याच्या हातातून खेचून त्याच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी सलमान खान विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधेरीच्या न्यायालयात सलमानविरोधात मारहाण आणि दरोड्याची ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.  तक्रारदार पत्रकार अशोक पांडेच्या जबाबानुसार, त्याने सलमान खान विरोधात मोबाईल हिसकावून  घेणे आणि धमकी देणे असे आरोप केले आहेत. तसेच त्याच्या जबाबात त्याने आपण व्हिडीओ करण्यापूर्वी सलमान खानची पूर्व परवानगी घेतली होती, असेही म्हटले आहे.  

अशोक पांडे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली असून त्यांचे  वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. 323, 392, 426, 506, आणि 34 या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या १२ जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

 

सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा आणि उध्दटपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो 24 एप्रिल रोजी. डीएन नगर येथे सलमान सायकलिंगचा मनोसोक्त आनंद लुटत होता आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अनेक जण त्याचे फोटो घेण्यासाठी धडपडत होते. त्या दरम्यान एका प्रसिध्दी माध्यमातील पत्रकाराने बॉलिवूड दबंग खानचा सायकलिंगचा आपल्या कॅमे-यात व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाईजान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा प्रचंड भडकले.व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या इसमाच्या हातातून दबंग खानने कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बॉडीगार्डसह दोघांनी त्याच्यावर अरेरावी केली.

Recommended

PeepingMoon Exclusive