'टिप टिप बरसा'........ आणि चिंब भिजले अक्षय कुमार आणि कतरिना कैफ

By  
on  

रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी'मध्ये खिलाडी अक्षय कुमार आणि सौन्दर्यवती कतरीना कैफ हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पिपिंगमुनने दिलेल्या नाहितीनुसार 'मोहरा' या सिनेमातलं सुपरहिट गाणं 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट करण्यात येणार आहे. 

नुकतंच कतरीना कैफने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन या फोटोमध्ये कतरीना आणि अक्षयच्या डोक्यावर टॉवेल गुंडाळला असून या सुपरहिट गाण्याच्या शूटिंगला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. या फोटोखाली कतरीनाने 'बारिश मे गाना' असं कॅप्शन लिहिलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Singing in the rain ️ #sooryavanshi @akshaykumar @itsrohitshetty @farahkhankunder

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

रोहित शेट्टी यांच्या सिनेमाचा अंदाज नेहमी वेगळा असतो. त्यामुळे 'टिप टिप बरसा पानी' रिक्रिएट करताना रोहित शेट्टी कोणती नवी पद्धत वापरतात याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मूळ गाण्याप्रमाणे या गाण्यातही पिवळ्या रंगाच्या शिफॉन साडीचा वापर करण्यात आला असून कतरीना या गाण्यावर थिरकणार आहे. मूळ गाण्यात अभिनेत्री रवीना टंडनने डान्स करून या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. आता कतरीनाचा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडणार का? हे पुढच्या काही दिवसांमध्ये कळून येईल. 

'सूर्यवंशी' हा सिनेमा रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार असून या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 27 मार्च 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Recommended

Loading...
Share