By  
on  

वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर लॉर्ड्स मैदानावर ‘83’ सिनेमाच्या क्लायमॅक्सचं शुटिंग होणार

सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचा माहोल आहे. प्रत्येकजण क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. पण कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली ऑनस्क्रीन किकेट टीमही ‘83’मधून रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी इंग्लडच्या लॉर्डस मैदानावर पहिला विश्वचषक विजय रिक्रिएट केला जाणार आहे. यावर अधिक बोलताना कबीर खान म्हणतात, जुलैपर्यंत सिनेमातील इतर मॅचेसचं शुटिंग पुर्ण केलं जाईल. तोपर्यंत वर्ल्डकपही संपेल. याच कालावधीत दीपिकाही टीमला जॉईन करेल.

 

दीपिका या सिनेमात कपिल देवची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये दीपिकाचा म्हणजेच रोमी देव यांचा महत्त्वाचा रोल आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यावेळी रोमी मैदानात उपस्थित होत्या. पण विंडिजच्या खेळाडूंचा जल्लोष पाहून नाराज झालेल्या रोमी पुन्हा हॉटेलवर गेल्या. पण खेळाची दिशा लवकरच बदलली आणि विजय भारताच्या समोर दिसू लागला त्यावेळी त्यांनी पुन्हा स्टेडियमवर जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाता आलं नाही. त्यामुळे तिथे असूनही हा सामना रोमी यांना हॉटेलच्या टीव्हीवर पहावा लागला. या सिनेमात आतापर्यंत भारत आणि झिंम्बॉबेचा सामन्यापर्यंतचं शुटिंग झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive