By  
on  

‘सुपर 30’च्या सेटवरून हृतिक ‘सरां’नी शेअर केला या विद्यार्थ्यांसोबतचा फोटो

ह्र्तिकच्या पहिल्या वहिल्या बायोपिक ‘सुपर 30’साठी त्याचे चाहतेदेखील खुप उत्साहात आहेत. ह्र्तिक या सिनेमा संदर्भातील काहीना काही सतत सोशल मिडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने या सिनेमातील त्याच्या काही विद्यार्थ्यांचा फोटो शेअर केला आहे.

 

 

यावेळी दिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ही आहे कुसुम. तिला बायोटेक इंजिनीअर बनायचं आहे. असह्य पाठदुखी असूनही रोज सेटवर यायची. तिच्या मागे आहे केशव. बोलताना माझ्यासारखाच अडखळतो, पण जगाला आपलं म्हणणं ओरडून सांगायला अजिबात कचरत नाही’ आतून खुप कणखर आहे.’ या सिनेमाच्या ट्रेलरची सगळी कडे चर्चा आहे ह्र्तिकच्या डी-ग्लॅम लूकलाही बरेच लाईक्स मिळत आहेत. ‘सुपर 30’ या सिनेमात तो पटनामधील गणिततज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमात हृतिकसोबत मृणाल ठाकूरही दिसत आहे. . हा सिनेमा 12 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive