By  
on  

सलमान-अलिया स्टारर ‘इन्शाअल्लाह’चा श्रीगणेशा वाराणसीमध्ये?

सलमानच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली की फॅन्स रिलीजकडे डोळे लावून बसतात. त्यात दिग्दर्शक संजयलीला भन्साळी असेल तर उत्सुकता जास्त असते. आता संजयलीला भन्साळींच्या सिनेमात सलमान काम करणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच. सलमान-संजय ‘इन्शाअल्लाह’मधून जवळपास २० वर्षांनी एकत्र येत आहेत. या सिनेमात सलमानसोबत आलियादेखील झळकणार आहे. या सिनेमाचं पहिलं शेड्युल फ्लोरिडा इथलं असल्याचं बोललं जात होतं. पण आता अशी बातमी येत आहे की या सिनेमाच्या शुटिंगचं पहिलं शेड्युल वाराणसी इथे सुरु होणार आहे. त्यानंतर टीम फ्लोरिडाला जाणार आहे.

सिनेसमीक्षक अतुल मोहन यासंबधी ट्वीट केलं होतं. पण हे ट्वीट त्यांनी थोड्यावेळाने डिलीट केलं. त्यामुळे वाराणसीच्या लोकेशनबाबत अजून संदिग्धता आहे. यादरम्यान इन्शाअल्लाह’चे लाइन प्रोड्यूसर चिन्मय पंडित यांनी सांगितलं की भन्साळी सरांनी हरिद्वार, हषीकेश आणि उत्तर काशी येथील लोकेशन पाहिले आहेत. आता नक्की कोणतं लोकेशन संजय यांना पसंत पडेल ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive