By  
on  

'अंदाज अपना-अपना'च्या सिक्वलमध्ये पुन्हा आमिर-सलमानची धम्माल, लेखकाने केली पुष्टी

सध्या बॉलीवूडमध्ये सिक्वेल आणि गाजलेल्या सिनेमांच्या रिमेकची चालती आहे. या प्रवाहात सलमान आणि आमिर यांच्या गाजलेल्या 'अंदाज अपना-अपना' सिनेमाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे लेखक दिलीप शुक्ल यांनी आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला, या गाजलेल्या कॉमिक ड्रामाच्या सिक्वेलमध्ये प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा झळकणार आहे. 

सलमान आणि आमिर शिवाय या सिक्वेलची कल्पनाच करू शकत नाही. या सिक्वेलमध्ये तीन नवीन कलाकार सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. या लोकप्रिय सिनेमाचा पुढचा भाग लिहिणं खूप अवघड काम आहे. या नव्या कहाणीला मला पहिल्या भागापेक्षाही अधिक आकर्षक बनवायचं आहे, असं मत दिलीप शुक्ल यांनी व्यक्त केलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या प्रोजेक्टमध्ये अमर आणि प्रेमच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग आणि वरुण धवन या दोन कलाकारांचा विचार केला जात आहे. परंतु कोणत्याही प्रकरची अधिकृत घोषणा करण्याआधी या सिनेमाचे मेकर्स सर्व गोष्टींची खात्री करू इच्छितात. 

सध्या सलमान आपल्या आगामी 'दबंग 3' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या चित्रीकरण करत आहे. हा सिनेमा हॉलिवूडमधले गाजलेला 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा अधिकृत रिमेक असणार आहे. 

सलमान-आमिरच्या अमर-प्रेमची गोष्ट पुन्हा पाहायला मिळणार का, यासाठी दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive