By  
on  

मलायका पहिल्यांदाच तिच्या आणि अर्जुनच्या नात्याविषयी बोलली,वाचा सविस्तर

इतके दिवस गुपित राहीलेलं अर्जुन मलायकाचं नातं आता सर्वांसमोर आलं आहे. खुद्द मलायका आणि अर्जुननेही अप्रत्यक्षरित्या का होईना या नात्याची कबुली दिली आहे. सध्या ही जोडी न्युयॉर्कमध्ये सुट्टी साजरी करत आहेत. अलीकडेच मलायकाने एका इंटरव्ह्युमध्ये अर्जुनच्या तिच्या नात्याविषयी खुलेपणाने चर्चा केली. घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नात्याला सुरुवात करण्याविषयी मलायका म्हणते, ‘माझं लग्न तुटलं त्यावेळी मी पुन्हा नात्यात जाण्याबद्दल साशंक होते. पण प्रेमात पडणं मी अगदीच नाकारलं नव्हतं. त्यामुळेच मी पुढे जाऊ शकले.’

दोघांच्या वयातील अंतराबाबत ती म्हणते, नात्यात वय कधीच मॅटर करत नाही. नात्यात मनं जुळणं महत्त्वाचं असतं.’ तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबाबत अरहानला काय वाटतं विचारलं असता ती म्हणते, ‘तुमच्या जवळच्यांना तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे हे समजणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांपासून काहीही लपवून ठेवत नाही. त्यांना माझ्या नात्याबद्दल कल्पना आहे. आम्ही सगळेच सध्या खुष आहोत हे महत्त्वाचं आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive