‘डान्स दिवाने’च्या सेटवर माधुरी थिरकली या सुपरस्टारसोबत

By  
on  

हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘सुपर 30’ सिनेमाबाबत खुपच उत्साहित आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतिक अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे.

नुकताच तो ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये दिसला होता. विशेष म्हणजे ‘डान्स दिवाने’मध्ये ह्र्तिकने माधुरीसोबत थिरकण्याचा आनंद घेतला. नृत्यकुशल असलेल्या या दोघांची नृत्यकेमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

पिवळ्या साडीमधील माधुरी यावेळी नेहमीसारखीच प्रफुल्लित दिसत होती. ‘सुपर 30’ सिनेमात हृतिक गणितज्ज्ञ आनंद राय यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमात हृतिकसोबत मृणाल ठाकूर झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share