By  
on  

शाहिदचा ‘कबीर सिंह’ 200 कोटींच्या जादुई आकड्याच्या उंबरठ्यावर

शाहिद कपूर सध्या निर्भेळ यशाचा आनंद घेत आहे. त्याच्या ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेक असलेल्या ‘कबीर सिंह’ने आतापर्यंत 190 कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला उचलून डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमाने 11 दिवसांच्या आत इतके कमावले आहेत.  सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी हे आकडे सोशल मिडियावरून शेअर केले आहेत.

या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 134.42 कोटींचा गल्ला जमवला होता. याशिवाय सिनेमाने दुस-या आठवड्यात 47.15 कोटींची कमाई केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला 9.07 कोटींचं कलेक्शन करत 190. 64 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

 

या सिनेमातील कियारा आणि शाहिदच्या केमिस्ट्रीला लोकांची पसंती मिळत आहे. या सिनेमाच्या तेलुगु रिमेकमध्ये विजय देवराकोंडाने अभिनय साकारला होता. या सिनेमात आदिल हुसैन, सोहम मजूमदार, अर्जुन, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता और कुणाल ठाकुर  यांच्या भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive