By  
on  

'फिट इंडिया'साठी सलमान खान देशभरात सुरु करणार ३०० जिम

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान स्वतःच्या फिटनेसबाबत किती जागरूक आहे हे सर्वांना माहितीय. सलमान खान नेहमी आपल्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 

सलमान खान लवकरच 'एसके-27' जिम फ्रैंचाइजी लाँच करणार आहे. या अंतर्गत २०२० पर्यंत देशभरात ३०० जिम्स सुरु करण्याचा भाईजानचा संकल्प असणार आहे.  'बीइंग ह्यूमन चेन', 'बीइंग स्ट्रॉन्ग फिटनेस इक्विपमेंट' नंतर सलमान खान जगभरात जिम आणि फिटनेस सेन्टरची साखळी सुरु करणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

After experiencing the highs and lows my security has finally realised how secure they are wid me .. ha ha

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

देशातील प्रत्येक नागरिकाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट बनवणं तसेच फिटनेस ट्रेनर आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून देणं, हा 'एसके-27' चा प्रमुख उद्देश आहे 

२०१९ च्या एप्रिल महिन्यात सलमानने व्यायामाचा नवीन ब्रँड 'बीइंग स्ट्रॉन्ग' लाँच केलं होतं. आजवर हे नवं उपकरण देशभरातील १७५ पेक्षा जास्त जिम्समध्ये स्थापन झालं आहे. 

सलमान सध्या 'दबंग 3' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive