By  
on  

अक्षय कुमारचा हा व्हिडियो पाहून तुम्हीही म्हणाल नाद खुळा !

सोशल मिडियावर दिवसागणिक अनेक चॅलेंजेस येत होता. एक काळ किकी चॅलेंज आणि व्हॉट द फ्लफ चॅलेंजने गाजवला होता. आता यात नव्या चॅलेंजची भर पडली आहे. ‘बॉटल कॅप चॅलेंज’ असं या नव्या चॅलेंजचं नाव आहे. या चॅलेंजला चेस करण्यात बॉलिवूड हॉलिवूडचे कलाकारही अजिबात मागे नाहीत.

 

नुकतंच खिलाडी अक्षय कुमारनेही ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण केलं आहे. यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक काचेची बाटली समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बाटलीचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्या कृतीमध्ये असं करताना ती बाटली खाली पडली नाही पाहिजे अशी अट असते. अक्षयने हॉलिवूड कलाकार जेसन स्टॅथमपासून अक्षयनेही प्रेरणा घेतली आहे. हा व्हिडियो पोस्ट करताना त्याने विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफला चॅलेंज दिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive