By  
on  

जिमिंग फ्रॅंचाईजी ने केला खुलासा; ह्रतिकला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं

अभिनेता ह्रतिक रोशन याच्यामागे असलेली अडचणींची मालिका संपता संपत नाहीये. कधी अभिनेत्रीची फसवणुक तर कधी वडिलांचं आजारपण तर कधी कौटुंबिक बाबी जगजाहीर झाल्याचं दु:ख. पण हृतिकच्या अडचणीत आता आणखी एक भर पडली आहे. ह्र्तिक विरोधात आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हृतिक सध्या ‘सुपर 30’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

कुकटपल्लीची शशीकांत नावाच्या व्यक्तीच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  CULT-FIT Health Care Private Limited या जिमिंग फ्रॅंचाईजीचा हृतिक ब्रॅंड अ‍ॅम्बॅसिडर आहे. शशिकांतने 2018मध्ये ही जीम जॉईन केली होती. यावेळी 17490 भरून घेताना या जिमने वर्षभर अनलिमिटेड वर्कआऊट सेशनची ऑफर दिली नाही. पण वर्षभरात एकही जीमिंग सेशन धड्पणे पूर्ण झाले नसल्याचा आरोप शशिकांतने केला आहे.

याबद्दल विचारणा केल्यास अरेरावीची उत्तरं मिळाली. त्यामुळे शशीकांतने हृतिकशिवाय च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यावर CURE-FIT Health Care Private Limited ने देखील ट्वीट करत या तक्रारीत फारसा दम नसल्याचं म्ह्टलं आहे. आपल्या ट्वीट्मध्ये ते म्हणतात, शशिकांत यांचं आमच्या स्टाफशी असलेलं वर्तन अत्यंत चुकीचं होतं. याशिवाय या प्रकरणात हृतिक रोशन यांना हकनाक गोवण्यात आलं आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive